breaking-newsआंतरराष्टीय

चिनी अंतरिक्ष स्थानकाचा वापर यूएनच्या सर्व राष्ट्रांनी करावा – चीन

बीजिंग (चीन) – आपण निर्माण करत असलेल्या अंतरिक्ष स्थानकाचा वापर यूएनच्या सर्व राष्ट्रांने करावा असे आवाहन चीनने केले आहे. सीएसएस (चायना स्पेस स्टेशन) च्या निर्मितीस सन 2019 मध्ये सुरूवात होणार असून सन 2022 मध्ये त्याचे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. सीएसएस ची निर्मिती आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) ला पर्याय म्हणून करण्यात येत आहे.

आयएसएस अमेरिका आंणि रशियासह पाच अंतरिक्ष संस्थांची संयुक्त परियोजना आहे. सीएसएसच्या निर्मिती प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. लहान वा मोठे, विकसित वा अविकसित, सर्वच देशांनी सीएसएससाठी चीनला सहकार्य करावे असे आवाहन चीनचे राजदूत शी झोंगजुन यांनी केले आहे.

चीनचे अंतरिक्ष स्टेशन सुरू झाल्यावर बाह्य अंतरिक्षाचा शांतिपूर्ण कार्यासाठी वापर सुरू होण्याचा आरंभ होईल. सीएसएसएलचा वैज्ञानिक कार्यासाठी वापर करण्यास संपूर्ण जगाला अनुमती असेल, असे यूएनओएसए (युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेयर्स) चे संचालक सीमानेटो डी पिप्पो यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button