breaking-newsराष्ट्रिय

साहित्य अकादमी पुरस्कार: कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांचा गौरव

साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.

साहित्य अकादमीने २२ भाषांमधील युवा साहित्यिकांच्या ११ काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कवितांचा अधिक प्रभावी ठरल्या. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या कार्यकारी समितीने पुरस्कारांना संमती दिली. युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. ३५ वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो. फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.

युवा साहित्य पुरस्कार

कविता : रुजब मुशाहारी (बोडो), अनुज लुगुन (हिंदूी), सागर नाजिर (काश्मिरी), अनुजा अकथुटु (मल्याळम), जितेन ओइनाम्बा (मणिपुरी), करन बिराहा (नेपाळी), युवराज भट्टराई (संस्कृत), गुहिराम किस्कू (संताली), किरन परयाणी ‘अनमोल’ (सिंधी) आणि सबरीनाथन (तमिळ) ल्ल कथा : संजीव पॉल डेका (आसामी), सुनील कुमार (डोंगरी),  तनुज सोळंकी (इंग्रजी), अजय सोनी (गुजराती), हेमंत अइया (कोंकणी) आणि कीर्त पुरहार (राजस्थानी) ल्ल कादंबरी : मोमिता (बाड्ला), फकीर (श्रीधर वनवासी जी. सी) (कन्नड), यदविंदर सिंह संधू (पंजाबी), गड्डम मोहन राव (तेलगु) आणि समाल अब्दुल समद (उर्दू) ल्ल समीक्षा : शिशिरा बेहेरा (ओडिया)

बाल साहित्य पुरस्कार

कविता : विजय शर्मा  (डोंगरी)  नाजी मुन्नवर  (काश्मिरी), भाविलाल लामिछाने (नेपाळी), संजय चौबे (संस्कृत), लक्ष्मण चंद्र सारेन (संथाली) ल्ल कथा : स्विमिम नसरीन (आसामी), गोविंद शर्मा (हिंदी), राजश्री बांदोडकर कारपुरकर (कोंकणी), बालागम भीमेश्वर राव (तेलुगु) आणि मोहम्महद खलिल (उर्दू)

लोककथा : लख्मीनाथ ब्रह्म (बोडो)

  • इतिहास : देविका करिअपा (इंग्रजी)
  • कादंबरी : चंद्रकांत करादल्ली (कन्नड), पवन हरचांदपुरी (पंजाबी)
  • नाटक : आर. के. सणहणबी चणु (मणिपुरी)
  • समग्र योगदान : वीरेंद्र कुमार सामंतराय (ओडिया), विणा शृंगी (सिंधी), देवी अचिअप्पन (देइवनइ) (तमिळ), नवनीता देवसेन (बाड्ला), कुमारपाल देसाई (गुजराती), मलयथ अप्पुनी (मल्याळम)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button