breaking-newsआंतरराष्टीय

मोदींकडून पाकिस्तान लक्ष्य

  • दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना जबाबदार ठरविण्याची मागणी

दहशतवादाला खतपाणी घालून त्यासाठी  आर्थिक मदत करणाऱ्या देशांना दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)  या संघटनेच्या शिखर बैठकीत मोदी यांनी शुक्रवारी या संघटनेची उद्दिष्टे व आदर्श यांवर भर देताना दहशतवादाचा मुकाबला करण्यात सहकार्य वाढवण्याच्या मुद्दय़ाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

दहशतवादमुक्त समाजाचे भारत समर्थन करतो, असे सांगून मोदी म्हणाले,की गेल्या आठवडय़ात आपण श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला झालेल्या सेंट अँटनी चर्चला भेट दिली. तेथे दहशतवादाचा उग्र चेहरा सामोरा आला. जगात सगळीकडेच निरपराध लोक दहशतवादास बळी पडत आहेत.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विविध देशांनी त्यांच्या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर पडून काम केले पाहिजे, असा टोला त्यांनी तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना अप्रत्यक्षपणे लगावला. जे देश दहशतवादाला खतपाणी घालून निधी पुरवतात त्यांना उत्तरदायी ठरवले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांतील स्थिरता व सुरक्षेसाठी अफगाणिस्तानची सुरक्षितता व भरभराट महत्त्वाची आहे, असे मोदी यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील लोक व तेथील सरकार यांना भारताचा खंबीर पाठिंबा आहे. शांघाय सहकार्य परिषदेनेही अफगाणिस्तान संपर्क गटाच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. या संघटनेच्या सर्वच कामांमध्ये भारताने सकारात्मक भूमिका पार पाडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी यांचे गुरूवारी किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आगमन झाले.

दहशतवादाविरोधात जागतिक परिषदेची सूचना

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी यंत्रणेअंतर्गत सदस्य देशांनी दहशतवादा विरोधी उपाययोजनांत सहकार्य केले पाहिजे. या संघटनेच्या नेत्यांनी दहशतवादाविरोधात जागतिक परिषदेचे आयोजन करावे, अशी सूचना करून नरेंद्र मोदी म्हणाले, की साहित्य व संस्कृती यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळते. त्यातून युवकांचे मूलतत्त्ववादीकरण थांबते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button