breaking-newsपिंपरी / चिंचवड

साहित्यातून उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अण्णा भाऊंनी केले – संजोग वाघेरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून समोर आणलं. त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रवादी उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, साहेबराव साळवे, काँग्रेसचे मनोज कांबळे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, उपाध्यक्ष दिपक लोखंडे, अक्षय बुगाव, सचिन साबळे, विशाल कसबे , विठ्ठल कळसे, अनिल घिसे, महादेव वाघमारे, दशरथ सकट, राजू आवळे, माणिक खंडागळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाट्य, लोकनाट्य, लावणी, वग, गण, गवळण, पोवाडे, प्रवासवर्णन असे सर्व साहित्यप्रकारातून मराठी साहित्य, लोककला, लोकजीवन त्यांनी समृद्ध केले. तमाशासारख्या कलेला लोकनाट्यकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत, अशा शब्दात वाघेरे यांनी त्यांचा गौरव करुन अभिवादन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button