breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावित्रीबाई फुले विद्यापीठ अधिसभेवर सदस्य म्हणून एका नगरसेवकाची होणार निवड

पदवीधर सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा प्रस्ताव महासभेत दाखल 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे एक वर्षांसाठी एका सदस्याचे नामनिर्देशन करण्याचा प्रस्ताव आज ( बुधवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत वन के नुसार दाखल करण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून एका नगरसेवकाला विद्यापीठाच्या अधिसभेवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव, निवडणूक विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना 14 सप्टेंबर 2018 रोजी पत्र पाठविले आहे.  या पत्रानूसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 कलम 28(2)(म)(28)(2) (y) नुसार कुलगुरुंनी विद्यापीठ क्षेत्रातील नगरपालिका, महानगरपालिकांच्या सदस्यांपैकी एका सदस्याचे विद्यापीठ अधिसभेवर एक वर्षासाठी चक्रक्रमाने नामनिर्देशन करण्याची तरतुद आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सदस्यांपैकी किमान पदवीधर असलेल्या एका सदस्यांची माहिती विहित नमुन्यात तात्काळ विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडे पाठविण्याचे कळविले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button