breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना केमिकल लेटर पाठवल्याप्रकरणी नांदेडमधून डॉक्टरला अटक, भोपाळला रवानगी

नांदेड | भोपाळ | मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नांदेड येथून एका डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, याच डॉक्टरने खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना ऑक्टोबर महिन्यात कथितरित्या एक पत्र पाठवले होते. त्यामध्ये धमकी आणि केमिकल पावडर भरले होते अशी तक्रार आहे. हाच लिफाफा साध्वींनी 13 जानेवारी रोजी उघडला होता. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि तपास सुरू झाला. पकडण्यात आलेल्या आरोपीला सविस्तर चौकशीसाठी भोपाळला नेण्यात आले आहे.

खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीने त्यांना लिफाफा आणि पत्र पाठवले होते. त्यामध्ये घातक रासायनिक पावडर होते. पोलिसांनी प्राथमिक तपासात अशा स्वरुपाचे तीन लिफाफे साध्वींच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. या पत्रात उर्दूमध्ये धमक्या देण्यात आल्या होत्या. याच प्रकरणी नांदेडच्या इतवारा पोलिस टीमने धनेगाव येथून एका होमिओपॅथी डॉक्टरला संशयित म्हणून अटक केली.

इतवारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संशयित डॉक्टर गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या रडारवर आला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये आपल्या आई आणि भावाचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत अशी धमकी देण्यात आली होती. त्याला या प्रकरणी अटक सुद्धा झाली होती. त्याला अशाच प्रकारचे पत्र पाठवल्याप्रकरणी यापूर्वी सुद्धा अटक करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button