breaking-newsपिंपरी / चिंचवड

साईट देण्याच्या कारणावरुन पिंपरीत स्कूल व्हॅनची टोळक्याकडून तोडफोड

पिंपरी –  साईट देण्याच्या किरकोळ वादातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका स्कूल व्हॅनची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास नाणेकरचाळ येथे घडली. या प्रकरणी विजय प्रभाकर बानायत (३२, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय हे रात्री स्कूल व्हॅनमध्ये इंधन भरण्यासाठी जात असताना रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची मोटार उभी होती. विजय यांनी हॉर्न वाजवून त्यांना मोटार बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने मोटारीतील पाच ते सहा तरुण विजय यांच्याकडे धावून आले. विजय आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेले ते तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे विजय यांनी व्हॅन सोडून पळ काढला. विजय पळून गेल्यानंतर आरोपींनी स्कूल व्हॅनची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवली. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button