breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवीतील ढोरे-शितोळे वाद पेटला : प्रशांत शितोळे आधी नगरसेवक होवून दाखवा : जवाहर ढोरे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शहरात कोरोनाची परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य जवाहर ढोरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

जवाहर ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना स्वतःचा आरसा दाखविला म्हणून चांगलेच झोंबलेले दिसत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात राजकीय दानत होती म्हणूनच प्रशांत शितोळे यांना तीनवेळा नगरसेवक होता आले हे संपूर्ण शहराला माहिती आहे. त्याचे आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. आमदार जगताप यांनी गावकी-भावकीसोबतच सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा नगरसेवक ते महापौरपदापर्यंत न्याय दिलेला आहे. त्यामुळे स्वतःला नगरसेवक होता येत नाही अशा शितोळे यांनी गावकी-भावकीचा फार ताण घेऊ नये. शहराचा नेता म्हणून फिरणाऱ्या शितोळे यांनी उगाचच आमदार जगताप यांच्यावर सातत्याने भुंकून स्वतःचे जनतेमध्ये हसू करून घेऊ नये. पुढील साडेचार वर्षे लक्ष्मण जगताप हेच आमदार असणार आहेत. त्यामुळे आधी दीड वर्षावर आलेल्या महापालिका निवडणुकीत शितोळे यांनी निवडणूक लढून जिंकून दाखवावे, असे खुले आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य जवाहर ढोरे यांनी दिले आहे.

जवाहर ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव घेतले नाही तर आपली कोणीच दखल घेत नाही आणि राजकीय पोळीही भाजता येत नाही, असा पिंपरी-चिंचवडमधील अनेक राजकारण्यांना वाटू लागले आहे. प्रशांत शितोळे हे त्यापैकीच एक आहेत. शितोळे यांना सांगवी भागाच्या गल्लीत कोणी विचारत नाही आणि ते शहर पातळीवरचे नेतृत्व करत असल्याच्या आविर्भावात फिरत असतात.

गावकी-भावकीचा आमदार जगताप यांच्यावर विश्वास…

आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात राजकीय दानत होती म्हणूनच प्रशांत शितोळे यांना तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून येता आले. आमदार जगताप यांनी शितोळे यांच्याप्रमाणेच गावकी-भावकीतील अनेकांना नगरसेवक म्हणून निवडून आणलेले आहे. गावकी-भावकीचाही आमदार जगताप यांच्यावर तेवढाच विश्वास आहे. केवळ गावकी-भावकीच नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आमदार जगताप यांनी केवळ नगरसेवकच केले नाही तर महापौर सुद्धा बनविले आहे. त्यामुळे शितोळे यांनी गावकी-भावकीचा फार विचार करून स्वतःच्या डोक्याला ताण देऊ नये. स्वतःची राजकीय पात्रता किती ते पाहावे. कायम लाथाडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात अपक्ष म्हणून लढायचे, त्या पक्षाचा उमेदवार पाडायचा आणि वरून मी पक्षासोबत प्रामाणिक राहिलो आहे, असे सांगायचे. यालाच खोटे पण रेटून बोलणे म्हणतात. भांडणे करणे, गोरगरीबांवर दादागिरी करणे, त्यांना लुबाडणे, महिलांची फसवणूक करणे हे सर्व प्रकार कोण करते, हे सांगवीतील सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे प्रशांत शितोळे यांनी स्वतःच्या दिव्याखाली असलेल्या अंधाराचा विचार करावा. महापौर माई ढोरे यांचा परिवार हा आमदार लक्ष्मण जगताप यांचा पूर्वीपासून कट्टर समर्थक राहिला आहे. त्यामुळे सांगवी भागातील जनतेने माई ढोरे आणि या परिवारातील सदस्यांना कितीवेळा नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले हे प्रशांत शितोळे यांना वेगळे सांगायची गरज नाही, असेही ढोरे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button