breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवीच्या पीडब्लुडी मैदानावर राष्ट्रवादीची होणार निर्धार परिवर्तनाची सभा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजप-शिवसेना युती सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा शनिवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवडला येणार आहे. त्या निर्धार परिवर्तन यात्रेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा युती सरकारवर तुटून पडणार आहेत. या परिवर्तन यात्रेला नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. 

या पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर,  प्रशांत शितोळे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, प्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वतीने 10 जानेवारीपासून रायगड येथून निर्धार परिवर्तन यात्रा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा दौरा करून शनिवारी ही यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहे. सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता ही निर्धार परिवर्तन सभा होणार आहे.

त्यामध्ये अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधान परिषेदतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. केंद्र, राज्य सरकारचा भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीच्या नवाने शहरात वाढलेला बकाळपणा, फसलेली जीएसटी, नोटाबंदी मंत्रिमंडळातील घोटाळे, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश अशा सरकारच्या विविध फसवी धोरणे नागरिकांच्या लक्षात आणून दिली जाणार आहेत. तसेच, भाजपचे सरकार बदलून परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button