breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशव्दारावर शिवमुद्रा लावावी

मारुती भापकर यांची महापाैर राहूल जाधव यांच्याकडे मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशव्दारावर शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गार वाक्य कायमस्वरुपी लावण्यात यावेत, अशी मागणी मारूती भापकर यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.

मारूती भापकर यांनी महापौर जाधव यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००७ ते २०१२ या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेचा सदस्य असताना महापालिका प्रवेशव्दार, महापालिका सभागृह व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची कोणशिला लावण्याची मागणी तत्कालीन महापौरांकडे केली होती. त्यानुसार या तिन्ही ठिकाणी कोणशिला प्रशासनाने लावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेसाठी केलेले क्रांतीकारी कार्य सर्वांना ज्ञात आहे. शिवरायांनी तलवारीच्या शक्तीने हे राज्य निर्माण करुन रयतेचे कल्याण केले. तर भिमरायांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर लेखणीच्या सहाय्याने स्वातंत्र, समता, बंधुत्व व न्याय या गोष्टीचा समावेश करुन सर्व समावेशक, सर्वांना समान न्याय देणारे जगातील सर्वत्तम संविधान संपुर्ण देशाला बहाल केले आहे.

महापालिका प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला भव्यदिव्य संविधान प्रस्तावना लावली आहे. त्याच धर्तीवर या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गगार वाक्य कायमस्वरुपी लावावेत. अशी मागणी दि.१७/०३/२०१२ रोजी तत्कालीन महापौरांकडे केली होती. त्यावर महापौरांनी दि.२९/०३/२०१२ रोजी पुढील उचित कार्यवाहीसाठी आयुक्त यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर आम्ही वेळोवेळी ही मागणी केली आहे.

भापकर यांनी पुढे म्हटले आहे की, छत्रपतींचा आर्शिवाद, चलो मोदी के साथ अशी घोषणा देत भाजपा महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवप्रेमींची मते घेवून सत्तेवर आली. सन २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुक निकालानंतर आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी भाजपाच्या सर्व विजयी नगरसेवकांना किल्ले शिवनेरी येथे नेऊन शिवप्रभुंची शपथ दिली. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन महापालिकेत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनीधी व नागरिक यांना कायम स्वरुपी शिवराय व भिमराव यांचे स्मरण होऊन त्याची काही अंशी प्ररेणा घेऊन आपल्या सर्वांच्या कामकाजात सुधारणा होऊन स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचार विरहीत व लोकाभिमुख, लोककल्याणकारी काम होण्यास अधिक गती मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रवेशव्दारावर शिवप्रतिमा, शिवमुद्रा, व शिवरायांबद्दल जागतिक स्तरावरील मान्यवरांचे उद्गगार वाक्य कायमस्वरुपी लावण्यात यावेत अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button