breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पोटात 10 कोटींचे ड्रग्ज लपवले ; 10 डझन केळी खायला देऊन ड्रग्ज कॅप्सूल बाहेर

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्कर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ही टोळी अफगाणिस्तानवरुन ड्रग्जची तस्करी करत होती. एका गुप्त माहितीनुसार या सात आरोपींना अटक करणयात आली आहे. हे सर्व आरोपी ड्रग्जचे कॅप्सूल पोटात लपवून आणत होते. तब्बल 10 कोटींपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींच्या पोटातून 20 ते 40 कॅप्सूल बाहेर काढले. या आरोपींना ड्रग्ज तस्करीच्या कामासाठी लाखो रुपये दिले जात होते. सात लोकांच्या पोटातून एकूण 117 कॅप्सूल काढण्यात आले आहेत. या सर्व ड्रग्स कॅप्सूलची किंमत 10 कोटींच्या जवळपास असेल. अटक केलेल्या रहमतुल्लाहच्या पोटातून 28, फैजच्या पोटातून 38, हबीबुल्लाह आणि वदूदच्या पोटातून 15-15, अब्दुल हमीद 18, फजल अहमदकडून 37 आणि नूरजइ कबीरकडून 26 गोळ्या काढल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button