breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे माझे शत्रू आहेत”- ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला..त्याचसोबत त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील नेपोटीझम आणि इंडस्ट्रीच्या बाहेरून येणाऱ्या कलाकरांना मिळणारी वागणूक याबाबत अनेक प्रश्न, आरोप होत आहेत…अनकेजण या मुद्द्यावर बोट ठेवत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रनौतनेही बॉलीवूडकरांवर तोफ डागली. कंगना नंतर सुशांतला बॉलिवूड मधील स्टार मंडळींकडून कधीच स्वीकारले गेले नाही आणि तसाच अनुभव आपल्याला सुद्धा आला आहे असे म्हणत  दबंग सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने मोठा खुलासा केला आहे. कश्यप यांनी इंडस्ट्रीतील टॅलेंट मॅनेजमेंट टीम कशा काम करतात याबद्दल काही धक्कादायक माहिती दिली आहे. मुख्यतः सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपल्या करिअरला कसे फ्लॉप करण्यासाठी प्रयत्न केले यावर कश्यप यांनी स्पष्टपणे मांडलं आहे. याशिवाय सुशांतच्या आत्महत्याचीही कसून चौकशी व्हावी अशी विनंती कश्यप यांनी सरकारकडे केली आहे.

अभिनव कश्यप यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये त्याने करिअरच्या त्यांच्या संघर्षाविषयी खुलेपणाने भाष्य केले आहे. सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी आपल्याला दबंगच्या रिलीजपासून आतापर्यंत जवळपास दशक भराचा त्रास दिला आहे. वेळ पडल्यास हे सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचीही तयारी कश्यप यांनी दाखवली आहे.

https://www.facebook.com/askashyap/posts/10158865186991844

“तुम्ही स्वतः तुम्हाला छळणाऱ्यांचा पर्दाफाश करा. नाहीतर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करु नका. सलमान खान कुटुंबाविरूद्ध हा माझा स्वतःचा लढा आहे आणि मी या लोकांसाठी पुरेसा आहे. मी कधीही आत्महत्या करणार नाही पण काही झाल्यास कोण दोषी असेल हे आता सगळ्यांनाच सांगत आहे. मला काही झाल्यास हेच विधान पोलिसांनी सुद्धा लक्षात घ्यावे असेही कश्यप यांनी म्हंटले आहे.

त्यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये लिहिले, “सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे माझे शत्रू आहेत याची मला कल्पना आहे. सलमान खान कुटुंब हे विषारी सर्पाचे तोंड आहे. ते सर्वांना घाबरवण्यासाठी कमावलेल्या पैशांचा, राजकीय संबंध आणि अंडरवर्ल्डशी असलेला संबंध वापरतात. पण त्यांच्या दुर्दैवाने सत्य माझ्या बाजूने आहे आणि मी सुशांतसिंग राजपूत सारखं सगळं काही सोडून देणार नाही. मी त्यांचा किंवा माझा दोघांचा शेवट होईपर्यंत मी संघर्ष करीन”. अशा जहाल शब्दात अभिनव कश्यप यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे…

दरम्यान, बॉलिवूड मध्ये इंडस्ट्रीच्या बाहेरून येणाऱ्यांना लगेच स्वीकारले जात नाही हे अनेकांनी बोलून दाखवले आहे. या एकूणच प्रकरणात सलमान किंवा त्याच्या कुटुंबाकडून अद्याप तरी काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑनलाईन चर्चांनुसार सुशांतला बॅन केलेल्या निर्मात्या कंपन्यांमध्ये सलमान खान प्रोडक्शनचे नाव सुद्धा समाविष्ट असल्याचं म्हंटलं जातय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button