breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम

पिंपरी ( महा ई न्यूज ) :- पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्‍या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेत प्रथम क्रमांक बेंगळुरुच्या मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी) आणि सांगलीच्या बिगल (महेश कोरी) यांनी पटकावला, अशी माहिती संस्थेच्या वतीने पुना केनल कॉन्फेडरेशनचे सचिव विजय पटवर्धन व प्रमुख आयोजक योगेश आकुलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. विजेत्‍यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍त आर.के.पद्‌मनाभन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
रविवारी (२१ ऑक्‍टोबर) वाल्हेकरवाडी चिंचवड येथे केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने ११२ व ११३ वी चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातींच्या श्वानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वानांची ११२ व ११३ वी चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात आली. ११२ व्या चॅम्‍पियनशीपचा निकाल खालीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), व्‍दितीय क्रमांक – अफगाण हाउंड (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), तृतिय क्रमांक – जर्मन शेफर्ड (संजय जाधव – सातारा), चतुर्थ क्रमांक – फ्रेंच बुलडॉग (रवि तेहरून – मुंबई), पाचवा क्रमांक – फॉक्‍स टेरियर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), सहावा क्रमांक – लॅब्रेडोर (चंद्रकांत ससाणे – पुणे), सातवा क्रमांक – बिगल (महेश कोरी – सांगली), आठवा क्रमांक – कारवार हाउंड (निनाद गाडकर – पुणे), बेस्ट पपी – अंकिता (अभय सुर्यवंशी, कोल्‍हापूर), रिझर्व्ह बेस्ट पपी – रोट वायलर (शुभम धनवडे – पुणे) यांनी पारितोषिक पटकावले. तसेच ११३ व्या चॅम्‍पियनशीपचा निकाल खालीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – बिगल (महेश कोरी – सांगली), व्‍दितीय क्रमांक – अफगाण हाउंड (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), तृतिय क्रमांक – फॉक्‍स टेरियर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), चतुर्थ क्रमांक – बॉक्‍सर (डेरी डी. – गोवा), पाचवा क्रमांक – फ्रेंच बुलडॉग (रवि तेहरून – मुंबई), सहावा क्रमांक – कारवार हाउंड (प्रसाद मयेकर – मुंबई), सातवा क्रमांक – जर्मन शेफर्ड (संजय व मनिषा जाधव – सातारा), आठवा क्रमांक – पग (अनिल दातखिळे – पिंपरी चिंचवड), बेस्ट पपी – अंकिता (अभय सुर्यवंशी, कोल्‍हापूर) यांनी पारितोषिक पटकावले.

परिक्षक म्‍हणून फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद्य व संजय देसाई यांनी परिक्षक म्‍हणून काम पाहीले. देशभरातून २७० श्वानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्‍यामुळे शहरवासियांना देश, विदेशातील नामांकित जातींचे श्वान पाहण्याची संधी मिळाली. स्पर्धा आयोजनात पुना केनल कॉन्फेडरेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड विभागातील श्वानप्रेमी योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, मनोज सोनिस, संजय मुत्तुर, नितीन ढमाले, विक्रांत भोसले, राजेश जाधव, गजानन बोखरे, प्रशांत जगताप, लक्ष्मण मड्‍डेवाड यांनी केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button