breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

अमरावती | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांना सांगितले होते. मात्र रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र 2 एप्रिल रोजी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आज (4 एप्रिल) पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button