breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कोंढव्यातील दुर्घटनेनंतर जाग

धोकादायक बांधकामांना महापालिकेकडून नोटिसा देण्यास सुरुवात

पुणे : कोंढवा येथील इमारत दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या महापालिकेने शहरातील धोकादायक बांधकामांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून, ५२ ठिकाणच्या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय ७८ जुने वाडे आणि मोडकळीस आलेल्या इमारतींनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कोंढवा आणि आंबेगाव येतील सीमाभिंत कोसळून २१ बांधकाम मजुरांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर शहरातील असुरक्षित सीमाभिंतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जाग आलेल्या महापालिकेने शहर आणि उपनगरातील २८७ मिळकतींची पाहणी केली. त्यानुसार ५२ ठिकाणची बांधकामे धोकादायक असल्याचे महापालिकेला आढळून आल्यामुळे या बांधकामांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा, हडपसर, मुंढवा, बालेवाडी या भागातील बांधकामे धोकादायक असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून स्थानिक रहिवाशांना अन्यत्र स्थलांतर करण्याची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. एकूण २२ ठिकाणचे लेबर कॅम्प महापालिकेकडून स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच ७८ धोकादायक ठिकाणांपैकी ५२ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शहराचा मध्यवर्ती भाग आणि पेठांमधील एकूण ७२५ इमारती आणि वाडय़ांची पाहणी करून त्यापैकी १७५ मिळकतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जीर्ण इमारतीमधील आणि जुन्या वाडय़ांमधील रहिवासी आणि भाडेकरूंना जागा खाली करण्यास सांगण्यात आले आहे. गृहरचना संस्था आणि इमारतींच्या धोकादायक सीमाभिंती, सीमाभिंती लगत असलेली घरे, झोपडय़ा, लेबर कॅम्प, डोंगरमाथा-डोंगर उतारावरील आणि नदी-नाल्यालगतच्या तसेच खोदकामालगतच्या मिळकतींची पाहणी सुरू करण्यात आली आहे.

कामगारांची नोंदणी

कोणत्याही प्रकारच्या बांधकामाच्या ठिकाणी मजूर तसेच कामगारांची कामगार आयुक्तालयात नोंदणी झाली आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करावी. ज्या विकसकाने नोंदणी केली नसल्याचे आढळेल त्या संबंधितांच्या कामाला परवानगी देऊ नये, असे आदेशही या वेळी भेगडे यांनी दिले. जिल्ह्य़ातील सर्व विभागांनी धोकादायक ठिकाणांच्या माहितीचा अहवाल तयार करावा आणि त्यानुसार सुरक्षिततेबाबत उपाययोजना कराव्यात. यामध्ये टाळाटाळ झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येईल, असेही भेगडे यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button