breaking-newsपिंपरी / चिंचवड

सर्व चाकरमान्यांची कोरोनातून मुक्तता कर, राष्ट्रवादीच्या मिना मोहिते यांचे बाप्पांना साकडे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षा मिना मोहिते यांनी घरामध्ये पर्यावरणपूरक गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे. आज सकाळी गणरायांची आरती करून संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनातून तत्काळ मुक्त करण्याचे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

मोहिते यांनी पिंपळे सौदागर येथील आपल्या राहत्या घरामध्ये काल गणरायांचे भक्तीभावाने स्वागत केले. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी त्यांनी शाडू मातीपासून बनविलेली गणपतीची मुर्ती बसवली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या सर्व पदाधिका-यांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुध्दा त्यांनी पर्यावरणपूरक गणरायांची मुर्ती बसविण्याचा संदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या घरामध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्याचा उद्देश समोर ठेवून गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली.

आज सकाळी भक्तीभावात गणरायाची आरती करून त्यांनी गणरायाला वंदन केले. महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांची कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्तता व्हावी, यासाठी त्यांनी बाप्पांना साकडे घातले. तसेच, गणरायांच्या मुर्तीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button