breaking-newsताज्या घडामोडी
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लवकरच सिंधुदुर्ग दौ-यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पहाणी व निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख लवकरच सिंधुदुर्ग दो-यावर येणार आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली मा. ना. अमितजी देशमुख यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सचिव आनंद परूळेकर, बाप्पा नाटेकर, गणपत वेंगुर्लेकर, रत्नागिरीचे सुरेश काटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.