breaking-newsआंतरराष्टीय

महिलेला जिवंत गाडले

मोगादिशु : सोमालियात एका महिलेला दहशतवादी संघटना अल-शबाबने एकापेक्षा जास्त पती असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.त्यानुसार तिची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुकरी अब्दुल्लाही वारसेम असे नवा असणाऱ्या या महिलेवर तलाक न घेता ११ लग्न केल्याचा आरोप होता. महिलेला आधी मानेपर्यंत जमिनीत गाडण्यात आले, यानंतर अल-शबाबकडून तिच्यावर दगडफेक करत ठार करण्यात आले.

अल-शबाब ही संघटना शरिया कायद्याची कठोरपणे अमलबजावणी करते. या दहशतवादी संघटनेचे सोमालियाच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे. अल-शबाबच्या स्वयंघोषित न्यायाधीशाने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपण गुप्तपणे ११ लग्नं केल्याची कबुली दिली होती. “शकुरी अब्दुल्लाही आणि तिच्या नऊ पतींना ज्यामध्ये तिच्या कायदेशीर पतीचाही समावेश होता, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रत्येकजण ही आपली पत्नी असल्याचे सांगत होते”, अशी माहिती शब्बेलेवर नियंत्रण असणारे शब्बाबचे गव्हर्नर मोहम्मद अबू उसामा याने दिली आहे.

इस्लाममध्ये महिलेने एकाहून जास्त लग्न करणं बेकायदेशीर आहे. मात्र पुरुषांना चार लग्नं करण्याची परवानगी आहे. पती आणि पत्नी दोघांसाठी घटस्फोटाची सुविधा आहे, मात्र पुरुष स्वत:हून वेगळा होऊ शकतो तर महिलेला पतीची परवानगी घेणं आवश्यक असतं. जर पतीने नकार दिला तर तिला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button