breaking-newsमनोरंजन

#MovieReview: धम्माल विनोदी ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’

चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट ठरला की निर्माते त्याचाचा सिक्वेल घेऊन येण्यास निर्माते, दिग्दर्शक उत्सुक असतात. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटाने  प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता त्याचा सिक्वेल ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
”हॅपी भाग जायेगी’ च्या पहिल्या भागात म्युझिशियन गुड्डूबरोबर (अली फजल) लग्न करण्याच्या हट्टापोटी हॅपी (डायना पेन्टी) ही बग्गासोबत (जिमी शेरगिल) लग्नाच्या मंडपातून पळून जाते. पण ती चुकून पोहोचते ती लाहोरच्या एका मंत्र्याच्या घरात, तिथे ती बराच गोंधळ घालते आणि शेवटी गुड्डूसोबत तिचे लग्न होते. बग्गा बिचारा पुन्हा वधूच्या शोधात लागतो. इथून पुढे काही वर्षांनंतर ‘हॅपी फिर भाग जायेगी’ची कथा सुरू होते. यामध्ये आणखी  एक हॅपी (सोनाक्षी सिन्हा) आपल्याला भेटते. ही हॅपी शांघायच्या एका युनिव्हर्सिटीत प्रोफेसरची नोकरी करण्यासाठी चीनला पोहोचली असते.
पण तिचा खरा उद्देश असतो लग्नाच्या मंडपातून पळालेल्या तिचा पती अमनचा शोध घेणे. तर दुसरीकडे पहिली तिचा पती गुड्डूसोबत एका म्युझिक कॉन्सर्टसाठी शांघायला आली आहे.  चँग (जेसन टी), जो एक हिंदी बोलणारा चिनी गुंड आहे,  दुसऱ्या हॅपीचे पहिली हॅपी समजून अपहरण करतो . पण ‘ही’ हॅपी ‘ती’ नाही म्हणून तिला शोधायला बग्गाला त्याच्या लग्नाच्या वरातीच्या घोड्यावरून किडनॅप केले जाते. पाकिस्तानचा पोलिस अधिकारी उस्मान अफरिदी (पीयुष मिश्रा) याचेही अपहरण करून त्यालाही चीनला आणले जाते. यानंतर बग्गा आणि अफरिदी चीनमध्ये हॅपीचा शोध सुरू करतात. पण त्यांना भेटते ती दुसरी हॅपी.
या सर्वांचे पुढे नक्की काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ अवश्य पहा.
विनोदी वन लाइनर्स आणि हसत खेळतं कथानक यामुळे चित्रपट अत्यंत मनोरंजक झाला आहे. लेखक दिग्दर्शक मुदस्सर अझीझ याने पेरलेल्या अबोध विनोदाने चित्रपट पाहताना चेहऱ्यावर कायम हसू राहत. हा दोन तासांचा चित्रपट हसून हसून पोट दुखवतो. बग्गा आणि अफरिदीच्या भारत-पाकिस्तान आणि चीनी-पंजाबी-ऊर्दू विनोदांवर पोट धरून हसताना कथेमधल्या अनेक विसंगतीकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.
कलाकारांच्य अभिनया बद्दल सांगायचे तर जिमी शेरगिलने बग्गा ही व्यक्तिरेखा साकारताना अप्रतिम अभिनय केला आहे. त्याचा अभिनय पाहून त्याच्यातील प्रतिभेची खोली जाणवते. सोनाक्षी सिन्हा,  पीयुष शर्मा  यांनी ही धमाल उडवून दिली आहे, या तिघांच्या वाट्याला अधिकाधिक विनोद आले आहेत. जस्सी गिल हा सुद्धा  हलक्याफुलक्या विनोदांनी या तिघांना सोबत करतो. अली फजल आणि डायना पेन्टी यांच्या वाट्याला फार काम नाही. एकंदरीत सांगायचे तर निखळ मनोरंजन करणारा धम्मल विनोदी  ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ आवर्जून बघायला हरकत नाही.
चित्रपट – हॅप्पी फिर भाग जायेगी
निर्मिती – आनंद एल रॉय, कृष्णा लुल्ला
दिग्दर्शक – मुदस्सर अझीझ
संगीत – सोहेल सेन
कलाकार – सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल, पीयूष मिश्रा, जस्सी गिल, डायना पेंटी, अली फजल
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button