breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सर्वसाधारण सभा एकोप्याने पार पाडण्यासाठी महापौरांचे विरोधकांना आवाहन

पिपंरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शहराच्या हितासाठी सर्वांना एकत्र येऊन विकासकामे करायची आहेत. शहराच्या हिताचे एकत्रित निर्णय घेऊ, सर्वसाधारण सभेत प्रत्येक विषयांवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे. विरोधाला विरोध न करता खेळीमेळीच्या वातावरणात आपण सर्वजण सभेचे कामकाज करुयात, असे आवाहन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी गटनेत्यांना केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा उद्या शुक्रवारी (दि. 20) होणार आहे. महापौर झाल्यानंतर ढोरे यांची उद्याची पहिलीच सभा आहे. म्हणून त्यांनी आपल्या दालनात गटनेते, माजी महापौरांची आज गुरुवारी (दि. 19) बैठक घेतली. सभेच्या एक दिवस अगोदर गटनेते, माजी महापौरांची बैठक घेऊन महापौर ढोरे यांनी चांगला पायंडा पाडला आहे.

बैठकीत सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर राहुल जाधव, अपर्णा डोके आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या की, सर्वांवर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे. शहरात चांगली विकास कामे करायची आहेत. सर्व मिळून एकत्रित कामे करुयात. नगरसेवकांच्या विविध विषयांवर चर्चा केली जाईल. सर्वांच्या संमतीने निर्णय घेतले जातील. एकोप्याने कामकाज करुयात. खेळीमेळीच्या वातावरणात महासभेचे कामकाज होईल. प्रत्येकाला आपली बाजू मांडायची असते. सर्वांना संधी दिली जाईल. परंतु, विरोधाला विरोध करु नका, गोंधळ घालू नका, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

शहरात पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपण सर्वजणांनी मिळून खरी परिस्थिती काय आहे? याची जागेवर जाऊन पाहणी करुयात. जागेवरुनच तक्रारी सोडविण्याचे प्रशासनाला निर्देश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button