breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नथूराम गोडसे हा भारतातील पहिला दहशतवादी – कमल हसन

चेन्नई : अभिनेता कमल हसन यांनी स्फोटक वक्तव्य केले आहे. तामिळनाडूतील अरावकुरिची येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवर निशना साधला आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी एक हिंदू होता, आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते. तेथूनच दहशतवादाला सुरूवात झाली, असे वक्तव्य हसन यांनी केले.

अरावकुरिची विधानसभेची पोटनिवडणूक येत्या १९ मे रोजी होत आहे. हसन यांच्या एमएनएम पक्षाने येथे एस मोहनराज यांना मैदानात उतरवले आहे. हा भाग मुस्लिम बहुल आहे. तेथे बोलताना हसन म्हणाले की, हा मुस्लिम बहुल भाग आहे, म्हणून मी हे बोलत नाही. पण माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. त्यांच्याच हत्येचे उत्तर काय असू शकते, हे शोधण्यासाठी आपण येथे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हसन म्हणाले की, मी एक अशा भारताची कल्पना करत जेथे सर्व समान असतील. मी एक उत्तम भारतीय आहे आणि माझ्याप्रमाणेच इतरांनी असावे अशी अपेक्षा बागळतो. हसन यांनी याआधी नोव्हेंबर २०१७ मध्ये हिंदू दहशतवादाबाबत वक्तव्य केल्यानंतर वादात आले होते.

हसन यांच्यावर भाजपकडून टिका

हसन यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तामिळनाडूतील प्रदेश भाजपचे अध्यक्ष सौंदरराजन यांनी टि्वट करत म्हटले आहे की, महात्मा गांधी यांच्या हत्येचा संबंध हिंदू दहशतवादाशी जोडणे योग्य नाही. पोटनिवडणुकीत अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी हसन असे मुद्दे उपस्थित करत आहेत.

हसन यांच्या घोषणापत्राचे नाव ‘कोवई 2024’

कमल हसन यांनी 21 फेब्रुवारी 2018 रोजी आपल्या पक्षाची स्थापना केली. हसन सातत्याने राज्यातील एआयएडीएमके आणि केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यांनी नुकतेच 2024 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी पाच वर्षे आधीच घोषणा-पत्र सादर केले आहे. देशात असे पहिल्यांदाच झाले आहे. या घोषणापत्राचे नाव ‘कोवई-2024′ ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button