Uncategorized

सरसेनापती शेलारमामांमुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘अडचणीत’!

  • ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सूचक इशारा
  • मामा-भाच्च्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते पडले बुचकळ्यात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. यानिमित्त भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी ”माझ्या राजकीय क्षेत्रातील सरसेनापती शेलारमामा” म्हणत वाघेरे पाटीलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदारांनी केलेला हा उल्लेख राष्ट्रवादी कॉंग्रेसला सूचक इशारा देणारा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलारमामांची भूमिका बदलल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस अडचणीत येऊ शकते.

आगामी महापालिका निवडणुकीला अवघ्या दीड वर्षाचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्यानुषंगाने भाजप-राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गमीमान होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीने पदाधिका-यांच्या नियुक्तीचा सपाटा लावला आहे. भाजपनेही शहरातील काही पदाधिका-यांच्या निवडी जाहीर केल्या. अशातच भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात जवळीक वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी वाघेरे-पाटीलांचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने आमदार लांडगे यांनी फेसबुकवर पावसात छत्री घेऊन चालत असतानाचा फोटो अपलोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”माझ्या राजकीय क्षेत्रातील सरसेनापती शेलारमामा” असा आमदार लांडगे यांनी पाटीलांचा उल्लेख केल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीला फंदफितुरीचा फटका ?

कोंढाणा जिंकताना तानाजीनंतर युध्दाची कमान शेलार मामांनी हाती घेतली. तानाजी कोसळल्यानंतर सेन्य सैरावैरा धावू लागले. तेवढ्यात शेलार मामांनी परतिचे दोर कापून टाकले. मावळ्यांपुढे जिंका अथवा मरा असा प्रसंग उभा ठाकला. अखेर शेलारमामांनी मुघल साम्राज्याला परास्त करून कोंढाणा पुन्हा मराठा साम्राज्यात विलीन केला. या ऐतिहासिक क्षणाप्रमाणे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत फंदफितुरी झाल्यास नवल वाटायला नको. आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गड भाजपच्या हातून निसटू लागल्यास राष्ट्रवादीचे शेलारमामा भाच्याच्या मदतीला धावणार की, राष्ट्रवादीची खिंड लढवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शेलारमामाचे मावळे बुचकळ्यात पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button