breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरपंचांची निवड सदस्यांमधूनच होणार -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर – भाजप सरकारच्या सरपंचाची निवड थेट लोकांमधूनच करण्यात येत होती. मात्र, आता ही पद्धत पुन्हा बदलण्यात येणार असून सदस्यांमधूनच सरपंच निवडण्यात येणार आहे, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते म्हणाले की, भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असं सांगतानाच सरपंचाची निवडण सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

वाचा :-राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

वाचा :-राज्यातील शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

मात्र, सरपंचाची निवड कशी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. भाजप काळातील लोकनियुक्त सरपंच निवडला जात होता. ही पद्धत चुकीची आणि लोकशाही विरोधी होती. निवडच करायची तर मग पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांचीच नियुक्त लोकांमधून व्हावी. एकट्या सरपंचाची कशाला? असा सवाल करतानाच फक्त ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत हा प्रयोग राबवण्यात अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button