breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी गर्दी…10 हजार पोलीसांचा बंदोबस्त…

पुणे | महाईन्यूज |

कोरेगाव-भीमा इथे आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी अनुयायांचा जनसागर लोटला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथे सकाळीच दाखल होत विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही त्यांनी केलंलं आहे.

कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभास प्रकाश आंबेडकर यांनी देखील अभिवादन करत मानवंदना दिली. अनेक मोठे नेतेही आज अभिवादनासाठी याठिकाणी जाणार आहेत. भीमा कोरेगाव इथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 10 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 250 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दीडशे एकरवरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 च्या दंगलीत सहभागी लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे,त्याचप्रमाणे पोलीसांकडून 744 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट करण्यात आलेत. महसूल प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित केली आहे.

दरम्यान आज परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच आठवडा बाजारही बंद राहणार आहे. पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. विजस्तंभावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button