breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामुंबईराजकारण

‘ते’ सौंदर्य पाहून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे भारावून गेले; म्हणाले, ‘परदेशातही असे…’

मुंबई : राज्यात नाट्यमयरित्या सत्तापालट झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. शिंदे सरकारने आरे मेट्रो कारशेडबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. या नंतर अमित ठाकरे यांनी आपले बंधू आणि शिवसेनेचे युवानेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली. याच दरम्यान अमित ठाकरे यांनी कोकण दौरा आयोजित केला असून आता या दौऱ्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी आंबोलीत घाटात निसर्गसौंदयाचा आस्वाद घेत आपले पर्यावरण प्रेम व्यक्त केले आहे. (amit thackeray overwhelmed by the natural beauty of konkan)

मनसे नेते अमित ठाकरे यांनी काल सावंतवाडी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी थेट आंबोली घाटातील चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कोकणचा ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोकणासाठी महत्वाचे असलेले इको-टुरिझमचे महत्व जाणून घेतले. या परिसरात सह्याद्रीतील अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. अशा या निसर्गरम्य परिसरातील असलेल्या अनेक धबधबे ठाकरे यांनी पाहिले. त्यांनी पाहिलेल्या निसर्गसौंदर्याबाबत आपले फोटो आणि त्याबाबत सांगण्याचा मोह अमित ठाकरे यांना आवरला नाही.

  • अमित ठाकरे कोकणातील निसर्गसौंदर्याने भारावले

सावंतवाडी हा बायो-डायव्हर्सिटीने संपन्न असा भाग आहे. असा हा सावंतवाजी आणि दोडामार्ग येथील वाईल्ड लाइफ कॉरिडॉर आपण सर्वांनी जीवापाड जपायला हवा, असे आवाहन त्यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेला केले आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य हे परदेशातही आपल्याला क्विचितच अुभवायला मिळते. आपण कोकणातील या निसर्गाचे मोल ओळखायला हवे, असे मनोगत यांनी फेसबुकवर व्यक्त केले आहे.

Amit Thackeray

अमित ठाकरे यांनी इको-टुरिझमचे महत्व जाणून घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button