breaking-newsराष्ट्रिय

सरकार स्थापनेसाठी जेडीएस-कॉंग्रेस यांच्यात आघाडी

  • कुमारस्वामींना मुख्यमंत्री करण्यास कॉंग्रेस राजी 
    राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार

र्बंगळुरू – त्रिशंकु अवस्थेतील कर्नाटक विधानसभेत सरकार स्थापनेसाठी जनता दल सेक्‍युलर आणि कॉंग्रेस एकत्र आले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी जेडीएसचे प्रमुख एच.डी देवगोैडा यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर देवेगौडा यांनी कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत मिळवण्या इतक्‍या जागा असल्याने या दोन्ही पक्षांतर्फे राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी दावा केला जाणार आहे अशी माहिती कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली.

आझाद म्हणाले की आम्ही जेडीएसला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्याला ते राजी झाले असून त्यांना त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडण्यास आम्ही सांगितले आहे. आम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी असून दलित समाजाच्या नेत्याला आम्ही उपमुख्यमंत्री करणार आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करण्यास तयारी दर्शवली असली तरी सारी सूत्रे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या हातात आहेत.

राजनैतिक संकेतानुसार सर्वाधिक जागा मिळवलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी प्रथम पाचारण करावे लागणार आहे. त्यानुसार भाजपला ते प्रथम सरकार स्थापनेसाठी संधी देतील असे सांगण्यात येते. तथापी जेडीएस आणि कॉंग्रेस आमदारांची एकजूट कायम राखली तर भाजपला बहुमत सिद्ध करता येणे अवघड ठरणार आहे. तिकडे दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन कर्नाटकातील स्थिती बाबत आढावा घेतला. पक्षाचे कर्नाटक शाखेचे निरीक्षक प्रकाश जावडेकर हे आजच सकाळी बंगळुरात दाखल झाले आहेत. तेही सरकार स्थापनेबाबतच्या स्थितीविषयी चाचपणी करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button