breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

सरकारी टीव्ही चॅनलच्या 27 वर्षीय महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमध्ये शनिवारी एका महिला पत्रकाराची गोळी घालून हत्या करण्यात आली. शाहीना शाहीन सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीमध्ये एक अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वी तिची बलुचिस्तानच्या तुरबतमध्ये बदली केली होती.शाहीन पूर्वी मागील वर्षी मे महिन्यात उरूज इक्बाल नावाच्या महिला पत्रकाराची देखील गोळ्या घालून हत्या केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून आतापर्यंत 28 वर्षांत पाकिस्तानात 61 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. दरम्यान पाकिस्तानात पत्रकार सुरक्षित असल्याचे पंतप्रधान इमरान खान यांनी या आठवड्यात एका मुलाखतीत म्हटले होते.

यापूर्वी शाहीनने इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही चॅनलमध्ये काम केले होते. यानंतर तिची निवड सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये झाली. इस्लामाबादमध्ये काही महिने राहिल्यानंतर तिची बलूचिस्तानच्या तुरबतमध्ये बदली झाली. ती एका स्थानिक मासिकाची संपादक देखील होती. 27 वर्षीय शाहीन क्वेटा विद्यापीठातून पीएचडी करत होती.

शाहीनची हत्या तिच्या घरात घुसून करण्यात आली. पोलिसांनुसार, दोन मारेकरी तिच्या घरी पोहोचले होते. शाहीनने दरवाजा उघडताच तिच्यावर गोळीबार केला. यात तिला पाच गोळ्या लागल्या. पोलिसांनुसार, एका अज्ञात व्यक्तीने शाहीनला कारमधून रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळानंतर तो गाडी तिथेच सोडून फरार झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. शाहीनच्या कुटुंबियांनी काही लोकांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिच्या पतीचा देखील समावेश आहे. शाहीनचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button