breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीसीएमटी वर्कशॉप विभागातील 108 सेवकांना महापालिकेत वर्ग करणार!

  • नगरसेवक वसंत बोराटे यांचा यशस्वी पाठपुरावा
  • विधी समिती सभेत पीएमपी सेवक वर्गीकरण प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी l प्रतिनिधी

पूर्वी असलेल्या (पिंपरी चिंचवड महानगर परिवहन) पीसीएमटीच्या 108 सेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग करून घ्यावे. त्यांचे वेतन महापालिकेच्या 40 टक्के हिश्यातून करण्यात येणार आहे. संबंधित सेवकांना महापालिकेत वर्ग करण्यास विधी समितीने मंजुरी दिली. नगरसेवक वसंत बोराटे यांनी याबाबत यशस्वी पाठपुरावा केला आहे.

पूर्वी असलेल्या पीसीएमटी मधील 108 सेवक पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) 13 आगारांमध्ये असलेल्या कार्यशाळेत काम करत आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीसीएमटीच्या काही सेवकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये वर्ग केले आहे. त्याच धर्तीवर या 108 सेवकांना देखील वर्ग करावे.

पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलचा 40 टक्के आर्थिक भार उचलते. या 108 सेवकांचे वेतन महापालिकेच्या 40 टक्के हिश्यातून करण्यात यावे. यामुळे सेवकांचे होणारे आर्थिक नुकसान थांबेल. हा विषय लवकरच महापालिकेच्या सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात यावा, असेही नगरसेवक बोराटे यांनी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.

नगरसेवक वसंत बोराटे यांनी केलेल्या सूचनेला संगीता ताम्हाणे आणि स्विनल म्हेत्रे यांनी अनुमोदन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button