breaking-newsमनोरंजन

‘समांतर’च्या दुसऱ्या सीझनमधून सतीश राजवाडे बाहेर

मुंबई : समांतर वेब सीरीजच्या दिग्दर्शनाचा खांदेपालट झाला आहे. समांतरचा पहिला सीझन दिग्दर्शक सतीश राजवाडेने दिग्दर्शित केला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये मात्र तो नसेल. या दुसऱ्या सीझनसाठी नवा दिग्दर्शक काम करणार आहे.

स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज, तेजस्विनी पंडित यांच्या अभिनयाने नटलेल्या समांतर वेबसीरीजला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 100 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज या सीरीजला मिळाले. तरीही हा अद्याप पहिलाच सीझन आहे. आता त्याचा दुसरा सीझन येणार आहे. पहिल्या सीझनचा दिग्दर्शक होता सतीश राजवाडे. सतीश आणि स्वप्नील यांची जोडी प्रेक्षकांना नवी नाही. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटांचे यशस्वी भाग या जोडीने दिले. शिवाय, मालिकही दिल्या. त्यामुळे दिग्दर्शक- कलाकाराची ही जोडी धमाल आणणार हे उघड होतं. तशी ती आलीसुद्धा. पण या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये सतीश राजवाडे या दिग्दर्शकाची जागा दुसऱ्या दिग्दर्शकाने घेतली आहे.

वेब एक्स्लुसिव्ह मुलाखतीत सतीश राजवाडेने या बातमीला दुजोरा दिला. सतीश राजवाडे आता संमांतरच्या दुसऱ्या सीझनचं दिग्दर्शन करणार नाहीय. त्याची जागा डबलसीट, धुरळा असे सिनेमे देणारा दिग्दर्शक समीर विद्वांस याने घेतली आहे. सध्या या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाचं कामही सुरू झालं आहे. याबद्दल सतीशने माहीती दिली. तो म्हणाला, ‘समांतरचा पहिला सीझन आण्ही ठरवला आणि मग मला स्टार प्रवाहच्या प्रोग्रॅमिंग हेड पदाची ऑफर आली. त्यामुळे चॅनलला मी या वेबसीरीजच्या कमिटमेंटची कल्पना दिली होती. त्यांनीही ती मान्य केली. त्यानुसार मी याचा पहिला भाग केला. आता दुसरा सीझन आहे. पण माझ्याच कामात मी खूप व्यग्र झालो आहे. त्यामुले हा दुसरा सीझन मला करणं शक्य नसल्याचं मी निर्मात्यांनीही सांगितलं. त्यानंतर त्याची धुरा आता समीर विद्वांसवर असेल. मला खात्री आहे पहिल्या सीझनपेक्षा हा दुसरा सीझन तो चांगला करेल.’

समीर विद्वांस आणि स्वप्नील जोशी यांनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच खेप आहे. यापूर्वी समीरने अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव आदी अनेक लोकांसोबत काम केलं आहे. दिग्दर्शक म्हणून तो कलाकारांचे प्लस पॉइंट चांगले हेरतो. म्हणून तो स्वप्नीलला आणि त्याच्या व्यक्तिरेखेला न्याय देईल अशी आशा समांतरच्या टीमला वाटते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button