breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘गांजाला मान्यता द्या’ म्हणणाऱ्या उदय चोप्राला मुंबई पोलिसांनी झापले, म्हणाले…

इंटरनेट ही अशी जागा आहे जिथे प्रत्येकजण आपले मत खुलेपणे व्यक्त करु शकतो. मात्र अनेकदा याचमुळे वाद उद्भवतात किंवा एखादा ट्रोल होतो. असेच काहीसे झाले आहे उदय चोप्राबद्दल. मारिजुआना म्हणजेच गांजाला कायदेशीर परवानगी द्या अशी मागणी त्याने एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मात्र आता उदय चोप्राला चक्क मुंबई पोलिसांनी या मागणीवरून खडेबोल सुनावले आहेत.

गेला काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर असणारा उदय चोप्रा या ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली पाहिजे. सर्वप्रथम तर हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात आली तर त्यावर आकारल्या जाणाऱ्या करातून बराच नफाही मिळू शकतो’, असं ट्विट त्याने केलं. त्यासोबतच गांच्याचे वैद्यकीय फायदे असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Uday Chopra

@udaychopra

I feel India should legalize marijuana. Firstly, It’s part of our culture. Secondly, I think if legalized and taxed it can be a huge revenue source. Not to mention it will remove the criminal element associated with it. Plus and most importantly it has a lot of medical benefits!

 

गांजाला कायदेशीर मान्यता देणं हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हणत उदयने मांडलेली त्याची भूमिका सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. मुख्य म्हणजे त्याच्या ट्विटची अनेकांनीच खिल्लीही उडवली. हा सर्व प्रकार पाहता खुद्द उदयने पुन्हा एक ट्विट केलं. ज्या ट्विटमधून आपण गांजा किंवा अशा कोणत्याच प्रकारच्या पदार्थाचा वापर करत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Uday Chopra

@udaychopra

I feel India should legalize marijuana. Firstly, It’s part of our culture. Secondly, I think if legalized and taxed it can be a huge revenue source. Not to mention it will remove the criminal element associated with it. Plus and most importantly it has a lot of medical benefits!

Uday Chopra

@udaychopra

And no I do not use it. I just really think it’s a wise move, given our history with the plant.

 

मात्र या ट्विटकडे मुंबई पोलिसांचेही लक्ष वेधले गेले असून त्यांनी उदयला यावरून खडे बोल सुनावले आहेत. या ट्विटमध्ये पोलिस उदय चोप्राला तुम्ही भारताचे नागरिक असल्याने अशा प्लॅटफॉर्मसवरून आपले मत खुलेपणे मांडू शकता असे सांगितले आहे. पुढे पोलिस म्हणतात, ‘मात्र सध्या तुम्ही ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की; गांजाचे सेवन करणे, गांजा बाळगणे आणि त्याची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉफिक सब्स्टेंसेस अॅक्ट १९८५ नुसार गांजा सेवन, गांजा बाळगणे आणि तस्करी करण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहचवा.’ विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी हे ट्विट पीन ट्विट करुन ठेवले आहे. म्हणजेच जो मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊण्टवर जाईल त्याला हे ट्विट सर्वात आधी दिसेल.

Mumbai Police

@MumbaiPolice

Sir,as citizen of India,you are privileged to express your view on a public platform. Be mindful,as of now, consumption, possession and transportation of marijuana, invites harsh punishment as per provisions of Narcotic Drugs and Psychotropic Substances Act,1985. Spread the Word

Uday Chopra

@udaychopra

I feel India should legalize marijuana. Firstly, It’s part of our culture. Secondly, I think if legalized and taxed it can be a huge revenue source. Not to mention it will remove the criminal element associated with it. Plus and most importantly it has a lot of medical benefits!

आता मुंबई पोलिसांनी केलेले हे ट्विटमध्ये उदय चोप्राला थेट दिलेली समज आहे की भारतामध्ये इतक्यात तरी गांजा विक्री आणि सेवनाला परवाणगी मिळणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे हे ट्विटवरून थेट समजत नसले तरी हवा तो संदेश त्यांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहचला आहे. मुंबई पोलिस कायमच ट्विटवर अॅक्टीव्ह असतात आणि तरुणाईच्या भाषेत ट्विट करण्यासाठी ते लोकप्रिय आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button