breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

समता पार्टीच्या माजी अध्यक्षा जया जेटली दोषी;बुधवारी शिक्षा सुनावणार

नवी दिल्ली – समता पार्टीच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना आणि समता पार्टीचे नेते गोपाल पाचेरवाल व निवृत्त मेजर जनरल एस. पी. मुरुगाई यांना तीन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्लीच्या न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती वीरेंद्र भट यांनी या सर्वांना दोषी ठरविले असून येत्या बुधवारी या सर्वांना शिक्षा सुनावली जाणार आहे. एकेकाळी गाजलेल्या “तहलका डॉट कॉम” या न्यूज पोर्टलने जया जेटली आणि इतर दोघांचे स्टिंग ऑपरेशन करून हा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता.

तेहलका डॉट कॉम’ने २०००-२००१ मध्ये “ऑपरेशन वेस्ट एंड” नावाचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यासाठी “वेस्ट एंड इंटरनॅशनल” या काल्पनिक कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून मॅथ्यू सॅम्युएल यांनी संरक्षण खात्यासाठी “हॅन्ड हेल्ड थर्मल कॅमेरे” पुरविण्यासंबंधीची जया जेटली, तात्कालीन मेजर जनरल एस. पी. मुरगाई, गोपाल के. पचेरवाल, सुरेंद्रकुमार सुरेखा यांच्याशी बोलणी केली होती. संरक्षण मंत्रालयासाठीच्या खरेदीसाठी मध्यस्थी करण्यासाठी इंग्लंडच्या तथाकथित वेस्टएंड कंपनीच्या प्रतिनिधीने ३ लाख रुपयांची लाच जया जेटली यांना दिली होती. या पैशाच्या देवाणघेवाणीचे मॅथ्यू सॅम्युअल या तथाकथित तेहलकाच्या प्रतिनिधीने व्हिडिओ शूटिंग केले होते.

या प्रकरणाचे अनेक टीव्ही चॅनेल्सवरून प्रक्षेपण करण्यात आले होते. टीव्ही चॅनेल्सवरून हे प्रकरण पाहून सीबीआयने आरोपपत्र दाखल करून या सर्वांच्या विरोधात खटला सुरू केला होता. तब्बल दोन दशके हा खटला चालला. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये निवृत्त मेजर जनरल एस. पी. मुरगआई यांना या भ्रष्टाचार प्रकरणी तसेच संरक्षण खात्यातील इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये तीन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता समता पार्टीच्या नेत्या जया जेटली व गोपाल पचेरवाल यांना या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले असून बुधवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button