breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘सध्याची परिस्थिती ही चिंताजनक नाही’- लव अग्रवाल

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिसागणिक वाढत चालला आहे..आजचा म्हणजे शनिवारचा आकडा पाहिला तर तो जवळ जवळ 1,666 वर जाऊन पोहला आहे…असं असलं तरी सध्याची परिस्थिती ही चिंताजनक नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

देशातील परिस्थिती चिंताजनक नसल्याचे सांगताना त्यांनी आकडेवारीही स्पष्ट केली. गुरुवारी एकूण १६ हजार ००२ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील केवळ २ टक्के रिपोर्टस हे पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. हे गणोत्तर चिंता कमी करणारे असल्याचा विश्वास लव अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधासंदर्भातही त्यांनी यावेळी माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला १ कोटी गोळ्यांची हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आवश्यकता आहे. आवश्यकतेपेक्षाही आपल्याकडे (जवळपास ३.२) अधिक साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य क्षेत्रातील मंडळी आपाल जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याविरोधात गैरवर्तन केल्यास त्याच्या कामावर परिणाम विपरित परिणाम होतो, असे सांगत कोणीही अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्यांच्या विरोधात गैरवर्तन करु नये, याचे भान बाळगावे, असे आवाहन लव अग्रवाल यांनी केले.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने सहा हजारचा टप्पा पार केला आहे. दोनशेहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. देशातील सध्य परिस्थिती पाहता लॉकडाऊन हटण्याची शक्यता आहे. ओडिसा आणि पंजाब या राज्यांनी लॉकडाऊन या महिनाअखेरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. असाच निर्णय महाराष्ट्र राज्यासह अन्य काही राज्यातही लागू  होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button