breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सेटलमेंटसाठी शेअर बाजारात नवी प्रणाली, १ जानेवारीपासून होणार लागू

नवी दिल्ली | प्रतिनिधी
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बाजार नियामक सेबीने नवी प्रणाली सुरू केली आहे. खरेदी विक्रीच्या सेटलमेंटसाठी ऐच्छिक पद्धतीने ‘T+1’ (व्यवहार + पुढचा दिवस) ही नवीन प्रणाली सुरू केली आहे.बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार वाढवण्यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. सध्या, देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंजवरील व्यवहार सेटल होण्यासाठी ट्रेडिंग दिवसानंतर दोन व्यावसायिक दिवस (T+2) लागतात. (SEBI Settlement Cycle)T+1 ऐश्चिक असेल

नियामकाने शेअर खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सेटलमेंटसाठी ‘T+1’ किंवा ‘T+2’ पर्याय दिले आहेत. हा सेटलमेंट प्लॅन ऐच्छिक आहे. म्हणजे ट्रेडर्स त्यांना हवे असल्यास ते निवडू शकतात. नवीन नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.तर, एकदा निवडलेली सेटलमेंट सायकल बदलण्यासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल. तसेच, स्टॉक एक्स्चेंजने T+1 सेटलमेंट सायकल निवडली की, ती किमान 6 महिने सुरू ठेवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button