breaking-newsराष्ट्रिय

एक दिवस इंदिरा गांधींसारखी माझी हत्या होईल – अरविंद केजरीवाल

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींसारखी एक दिवस माझी हत्या होईल असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टी माझ्या मागे लागली असून एक दिवस ते माझी हत्या घडवून आणतील असे केजरीवाल म्हणाले.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींसारखी एक दिवस पीएसओ माझी हत्या करेल असा दावा केजरीवाल यांनी केला. पीएसओ म्हणजे खासगी सुरक्षा अधिकारी. भाजपा माझ्या आयुष्याच्या मागे लागली असून एक दिवस ते माझी हत्या घडवून आणतील असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवालांचा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यावर विश्वास राहिलेला नाही. हा पीएसओ भाजपाला रिपोर्टींग करतो असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या मोती नगर भागात रोड शो सुरु असताना एका व्यक्तीने अरविंद केजरीवालांच्या कानाखाली मारली होती. केजरीवाल जमलेल्या गर्दीला अभिवादन करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला हा माणूस अरविंद केजरीवाल असलेल्या खुल्या जीपवर चढला आणि त्यांच्या कानशिलात लगावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button