breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संविधान दिनानिमित्त पालिकेतर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह सर्व पक्षाचे गटनेते, क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष, पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती राहणार आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता महापालिका मुख्य कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन कार्यक्रमस्थळी होणार आहे. त्यानंतर सव्वासहा वाजता वाजता आमचा अभिमान आमचे संविधान हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी आठ वाजता जॉली मोरे प्रस्तुत वुई द पिपल या संविधान जनजागृतीपर भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सांगता होणार आहे. तरी, या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button