breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवावे – महापौर राहूल जाधव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुलांनो देशाचे भविष्य तुम्ही आहात, चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला सत्य-असत्याची जाणीव व्हावी व सत्याला सामोरे जाऊन तुम्ही सर्वांनी उज्वल भवितव्य घडवावे. देशाच्या प्रगतीसाठी ती अभिमानाची गोष्ट ठरेल, असे मार्गदर्शन महपौर राहुल जाधव यांनी विद्यर्थांना केले.

आज पिंपरी-चिंचवड महापालिका व फोर्ब्स मार्शल प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यामाने शुक्रवार (दि. २३) ते रविवारी (दि. २५) दरम्यान आयोजित बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्निवल सिनेमा, चिंचवड याठिकाणी झालेल्या कार्यक्रमास सहशहर अभियंता प्रविण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, फोर्ब्स मार्शल प्रा. लि. कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्स, सी. एस. आर.च्या बिना जोशी, प्रशासन अधिकारी पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले, बाल चित्रपट तज्ञ प्रसन्ना हुलकवी, पीसीएमसीसीएसआरचे विजय वावरे व बहुसंख्येने विद्यर्थी, विद्यर्थीनी व पालक उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, बाल चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून तुमचा व्यक्तीमहत्व विकास होईल. या बाल चित्रपट महोत्सवाच्या कार्यशाळेतून चित्रपट कसे बनविले जातात, या बद्दलचे ज्ञान तुम्हास प्राप्त होईल. पडद्यामागील सत्यही तुम्हाला कळेल.

फोर्ब्स मार्शल कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्स म्हणाल्या की, आम्ही सीएसआरच्या माध्यमातून नदी प्रदुषणावर काम करणार आहोत. महापौरांनी दरवर्षी बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करावे.

शुक्रवार (दि.२३) ते रविवार (दि. २५) दरम्यान आयोजित केलेल्या बाल चित्रपट महोत्सवामध्ये शहरातील तीन हजार ते साडेतीन हजार विद्यर्थी विद्यर्थीनी सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशहर अभियंता प्रविण तुपे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार बिना जोशी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button