breaking-newsराष्ट्रिय

संरक्षण मंत्री फ्रान्समध्ये करणार ‘शस्त्रपूजन’; भारतात घेऊन येणार पहिलं राफेल विमान

राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणं मंत्री राजनाथ सिंह पॅरिसला जाणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी पहिले राफेल लढाऊ विमान फ्रान्सकडून भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. दरम्यान, याच दिवशी विजयादशमी असल्याने राजनाथ पॅरिसमध्ये राफेलचे पुजन अर्थात शस्त्रपूजन करणार आहे.

हिंदू परंपरेमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाते. यामध्ये सैनिक आपल्या हत्यारांची पूजा करतात. आधुनिक काळातही घरोघरी लोखंडी हत्यारं किंवा साधनं पूजली जातात. त्याअनुषंगाने राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅरिसमध्ये राफेलपूजन करणार आहेत. यापूर्वी आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजनाथ सिंह प्रत्येक दसऱ्याला शस्त्रपूजन करीत होते. आता संरक्षण मंत्री झाल्यानंतरही ते आपली ही परंपरा कायम राखणार असल्याचे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात.

राजनाथ सिंह लवकरच पॅरिसला जाणार आहेत. तिथे ते फ्रान्सचे राष्ट्रापती इमॅन्युएल मैक्रो यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे भारतासाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल विमान सुपूर्द करण्यात येणार आहे.

राफेल लढाऊ विमानं खरेदी प्रकरणातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधानांसह सरकारला सातत्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांदरम्यानही विरोधकांसाठी हा मुद्दा सर्वांत अग्रभागी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button