breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विठुरायाच्या चरणस्पर्शाची मनोकामना पूर्ण झाली; आमच्या विनायक आबांनी पुण्य कमावले!

  •  पंढरपूर यात्रेनंतर चिखली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या भावना

  •  सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरेंचा विधायक उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

कोविड आणि लॉकडाउननंतर आता राज्यातील मंदिरे खुली झाली. गेल्या ७ ते ८ वर्षांत मनात इच्छा असूनही पंढरपुरच्या विठुरायाचे चरणस्पर्श करता आले नाही. मात्र, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे आणि सोनम मोरे यांच्यामुळे आमची मनोकामना पूर्ण झाली. आबांनी पुण्य कमावले, अशा भावना ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केल्या.

टाळगाव चिखली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पंढरपूर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध आणि कौटुंबिक यात्रा पार पडली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे, चिखली प्रभाग क्रमांक २ मधील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. १ हजारहून अधिक ज्येष्ठांनी या यात्रेत सहभाग घेतला. वय वर्ष५५पासून ते ८५ वर्ष वयापर्यंतच्या ७०० जोडप्यांचा जेष्ठ नागरिक सन्मान चिन्ह आणि टोपी- उपरणे देऊन सत्कारही करण्यात आला.
विष्णु नामदेव तुपे (वय- ८५) म्हणाले की, वयोमानानुसार गेल्या ७ ते ८ वर्षांत पंढरपूरची वारी करता आली नाही. पांडुरंगाचे दर्शन करता आले नाही. कोरोनाच्या महामारीमुळेही मंदिरे बंद होती. दर्शनाची ओढ असतानाही पंढरपुरला जाता आले नाही. मात्र, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबांनी आम्हां ज्येष्ठांना पंढपूर दर्शन यात्रा मोफत घडवली, सामाजिक काम कसे असावे? याचा आदर्श आबांनी घालून दिला आहे.

प्राण गोपाल नंदीराज (वय- ८०) म्हणाले की, सर्व ज्येष्ठांना पांडुरंगाच्या दर्शनाला आणले आणि आम्हाला पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता आले. विनायक आबांमुळे आम्हाला या यात्रेत सहभागी होता आले. कोणताही खर्च आम्हाला करावा लागला नाही. ज्येष्ठांच्या भावना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आबा खरंच चांगले काम करीत आहेत.

सदाशिव नामदेव नांगरे (वय- ७८) म्हणाले की, आम्ही धन्य पावलो. आबांनी केवळ सेवा केली नाही. या यात्रेत सकाळी नाष्टा, दुपारी जेवन, संध्याकाळी जेवन अशी सर्व सुविधा चांगली करण्यात आली होती. आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून सर्व काळजी घेतली. अगदी घारातल्या व्यक्तीप्रमाणे आबांनी आमची काळजी घेतली. आबांचा उपक्रम हा सर्वांसाठी आदर्शवत आहे.

  • यात्रेकरुंच्या आरोग्याचीही घेतली काळजी…

विठोबा गोविंद वीर (वय- ७६) म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबांनी संपूर्ण यात्रेमध्ये एक कार्डिओ ॲब्युलन्स, चार डॉक्टरांचे पथकही सोबत ठेवले होते. ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे कोणाला त्रास झाला, तर तात्काळ उपचार करता येतील, इतकी अचूक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत आबांनी आमची काळजी घेतली. कोणाला काही अडचण आहे का? कोणाला आरोग्याचा त्रास होतो आहे का? अशी वारंवार विचारपूस करणारे विनायक आबा आपल्या कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे काळजे घेत होते. आम्हा ज्येष्ठांचा सत्कार केला. ज्येष्ठांना मान आणि सामाजिक जाण असलेल्या आबांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे, असेही वीर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button