breaking-newsपिंपरी / चिंचवड

संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा रक्तदान शिबिरात 819 जणांचे रक्तदान

पिंंपरी –  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 819 रक्तदात्यांनी रक्तदान केले

या शिबिराचे उदघाटन पुणे झोनचे ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, अभिषेक बारणे, स्वीकृत सदस्य गोपाळ मलेकर, डब्बू आसवानी, नगरसेविका उषा काळे, मारुंजीचे सरपंच कृष्णा बुचडे आदी उपस्थित होते. या वेळी निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल, साधसंगत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून 14 ते 23 जून पर्यंत रक्तदान जनजागृती मोहीम आखण्यात आली होती. या मध्ये पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर या ठिकाणी जाऊन पथनाट्य, बाईक रॅली, पदयात्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.तसेच घरा-घरामध्ये जाऊन रक्तदानाची प्रेरणा देण्यात आली. काळेवाडी येथे संत निरंकारी सत्संग भवन हे शिबिर झाले. रक्त संकलनाचे कार्य वायसीएम हॉस्पिटल रक्तपेढी, ससून हॉस्पिटल रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button