breaking-newsआंतरराष्टीय

सौदी अरेबियात महिला करू लागल्या ड्रायव्हिंग

रियाध- सौदी अरेबियामध्ये महिलांना वहाने चालवण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सौदीतील महिला आता वाहने चालवण्याचा आनंद घेऊ लागल्या आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे सौदीत मोठे सामाजिक स्थित्यंतर घडून येणे अपेक्षित आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मागास विचारांच्या आपल्या देशात आधुनिकता आणण्याच्या हेतूने उचललेले हे मोठे पाऊल आहे. यापूर्वी महिलांच्या ड्रायव्हिंग बंदीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले गेले होते. महिलांच्या ड्रायव्हिंगवरील बंदी काल मध्यरात्री उठवल्यानंतर रस्त्यांवर महिला चालक असलेल्या कार धावू लागल्याचे चित्र बघायला मिळाले. यापैकी कित्येक महिलांनी आपल्या कारमध्ये मोठ्या आवाजात संगीतही वाजवून आनंद व्यक्‍त केला.

लेखिका, निवेदिका, टिव्ही कार्यक्रमांच्या सादरकर्त्या आदी प्रसिद्ध महिलांनी या निर्णयावरून आपला आनंद व्यक्‍त केला आहे. पुरुषांच्या अधिपत्याखाली जखडलेल्या महिलांना आता मोकळा श्‍वास घेता येऊ शकेल, अशी भावना या महिलांनी व्यक्‍त केली. रस्त्यावर ड्रायव्हर महिलांच्या उत्साहाला उधाण आले असताना काही महिलांनी आपले ड्रायव्हिंगचे व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केले. या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी ड्रायव्हर महिलांना पुष्पगुच्छही वाटले जात होते.

सध्या सौदीमध्ये ड्रायव्हिंगसाठी विदेशी महिलांना स्वतःच्या मूळ लायसेन्सच्या आधारे तेथील एक प्रॅक्‍टिकल टेस्ट द्यावी लागणार आहे. आता सौदीतील किमान 30 लाख महिलांना ड्रायव्हिंग लायसेन्स मिळू शकणाऱ्‌ आहे. महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी मिळाल्याने महिलांच्या रोजगारात वाढ होईल आणि 2030 पर्यंत 90 अब्ज डॉलरची उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. कारबरोबर हर्ले डेव्हिडसन सारख्या बाईक चालवण्यासाठीही महिला आता ट्रेनिंग घेऊ शकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button