breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’, तुमची तक्रार काय आहे?

“हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तक्रारी लिहून स्वत: उत्तर दिलं. त्यामुळे तक्रारींसाठी फोन करणाऱ्या पुणेकरांना आश्चर्याचा धक्काच बसला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. कोरोनाकाळात गेले दहा महिने डॉक्टर, नर्स, पोलीस सगळे जण कष्ट घेत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं.

आमचे पोलीस या दहा महिन्यात दिवस रात्र काम करुन थकला जरुर आहे, पण हिंमत हरलेला नाही. आजही त्याच हिंमतने सणवार असो, उत्सव असो, मोर्चे असो, आंदोलनं असो पोलीस दिवसरात्र रस्त्यावर राहून काम करत आहेत. 31 डिसेंबरला नागरिक नववर्षाचं स्वागत करत असताना पोलीस रस्त्यावर उभं राहून कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काम करतोय. त्यामुळे मी आज नवीन वर्ष साजरं करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आलो. मी सर्व पोलीस सहकाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया यावेळी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button