breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संजय गांधी निराधार योजनेच्या 1154 लाभार्थ्यांनी व्यक्त केले समाधान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संजय गांधी निराधार योजना समिती, अप्पर तहसील कार्यालय, मुळशी तहसील कार्यालय आणि अन्नधान्य वितरण विभाग आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने शासन आपल्या दारी योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या 954 लाभार्थ्यांनी तसेच केंद्र सरकारच्या उज्वला गॅस कनेक्शनचा 200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप व तहसीलदार राधिका बारटक्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास संजय गांधी योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने, नायब तहसीलदार भगवान पाटील, मेधा देशमुख, परिमंडल अधिकारी-दिनेश तावरे, मंडल अध्यक्ष काळुराम बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, झामाताई बारणे,सविता खुळे, अर्चना बारणे, मनिषा पवार, माजी नगरसेवक सिध्देश्‍वर बारणे, संतोष बारणे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य दिलीप गडदे, संजय मराठे, राजेंद्र पाटील, अश्‍विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे, स्विकृत नगरसेवक-संदीप गाडे, विनोद तापकीर, विद्युत समिती अध्यक्ष-संजय मरकड, सामाजिक कार्यकर्ते-गणेश नखाते, संतोष जगताप, मंडल अधिकारी-शेखर शिंदे, हेमंत नाईकवडी, रतन गॅस एजन्सीच्या क्लार्क-समिना पवार उपस्थित होते.

  • आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील संजय गांधी निराधार योजनेपासून कुठलाही लाभार्थी वंचीत राहु नये याची दक्षता समितीच्या सदस्यांनी घ्यावी. येणार्‍या लाभार्थ्यांचे 100 टक्के पेपर पुर्ण करुन अर्ज भरुन घ्यावा तरच आपले शिबीर यशस्वी होण्यास मदत होईल. मागील पाच वर्षापासून दरवर्षी शिबीर भरविण्यात येते. आलेल्या लाभार्थ्यांनी आपली फाईल पुर्ण झाल्याची खात्री करुन घ्यावी येणार्‍या काळामध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शासकीय योजने पासून कोणताही लाभार्थी राहणार नाही. अशी आशा मी बाळगतो.

संजयगांधी तहसीलदार राधिका बारटक्के म्हणाल्या की, संजय गांधी योजना समितीचे आठ तालुक्याचे कामकाज माझ्याकडे चालते यापैकी चिंचवड विधानसभा सगळ्यात जास्त लाभार्थ्यांची संख्या पेन्शन मिळण्यामध्ये या चिंचवड मतदार संघात आहे. यापुढे शिबीर कधीही घेण्यात यावे. आमचे कार्यालय आपणास मदत करायला तयार आहे.

  • या शिबीरामध्ये अंध, अपंग, मुकबधीर, कर्णबधीर, विधवा महिला, घटस्पोटीत महिला, 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी तलाठी, मंडल अधिकारी, महा-ई-सेवा केंद्र, परिमंडल अधिकारी, रतन गॅस एजन्सीचे अधिकारी, नायब तहसीलदार उपस्थित असल्यामुळे तहसील उत्पन्न दाखला व शासकीय योजनेचा लाभ घेत नाही, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड वरील उत्पन्न कमी करणे, हॉस्पिटलचा वयाचा दाखला, अपंग दाखला सर्व दाखले शिबीराच्या ठिकाणी मिळाल्यामुळे योजनेचे लाभार्थी समाधान व्यक्त करीत होते.

शिबीर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण जगताप मित्र परिवाराचे सदस्य चंद्रकांत तापकीर, दिपक जाधव, प्रवीण वाघमोडे, माऊली जगताप, अमोल शिंदे, रेखा माने, कुंदा गडदे, पंकज तारकर, दिपक मनेरे, रणजित घुमरे, संजय भोसले, शिवाजी शेळके, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यकमाचे सुत्र सुत्रसंचालन-स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button