breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांस्कृतिक महोत्सवातील स्पर्धकांचा महापौर, स्थायी सभापतींच्या हस्ते गौरव

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कला व सांस्कृतिक धोरणाअंतर्गंत आयोजित महिला महोत्सवातील विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आज सकाळी पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या सिमा सावळे, आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर जुंधारे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, उपअभियंता शिवाजी चौरे आदी उपस्थित होते.

या महिला महोत्सवात आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वाती पाटील,‍ व्दितीय क्रमांक वर्षा चराठे व तृत्तीय क्रमांक अनिता परदेशी यांनी पटकावला. मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आदिती जगताप, व्दितीय क्रमांक प्रियंका जुजकर व तृत्तीय क्रमांक लक्ष्मी कोकाटे यांनी तर वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वर्षा सराटे, व्दितीय क्रमांक सुमेघा देवचक्के व तृत्तीय क्रमांक हर्षा कटारीया यांनी पटकावला.

तर पाककला स्पर्धा (तिखट) पदार्थ गटात प्रथम क्रमांक वैजयंती हिंगे, व्दितीय क्रमांक त्र५तू गुप्ता व तृत्तीय क्रमांक मंजीरी जवळीकर यांनी पटकावला पाककला स्पर्धा (गोड) पदार्थ गटात प्रथम क्रमांक त्र५तू गुप्ता, व्दितीय क्रमांक मीना मांडके,‍ तृत्तीय क्रमांक मालती कोष्टी यांनी पटकावला.या सर्व विजेत्यांना या वेळी गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे मुख्य लिपीक रमेश भोसले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button