breaking-newsमहाराष्ट्र

संगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी

संगमनेर- पुण्यामध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली असतानाच आता संगमनेर तालुक्याला देखील स्वाईन फ्लू आजाराने विळखा घालण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथील सुरेश बाबुराव फटांगरे (वय ४५) यांचा स्वाइन फ्लूची लागण झाल्याने नाशिक येथे उपचार दरम्यान आज मृत्यू आला. हा तालुक्यातील महिनाभरातील सहावा बळी आहे.

फटांगरे यांनी संगमनेर शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतला होता. मात्र त्यांची तब्बेत अचानक खराब झाल्याने त्यांना काल नाशिक येथे हलवण्यात आले होते. नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा आज दुपारी मृत्यू झाला. असून तालुक्यातील स्वाइन फ्लूची लागण झाल्याने हा सहावा बळी असल्याने आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button