गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील…- चित्रा वाघ भडकल्या (VIDEO)
मुंबई | प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असे वक्तव्य पाटलांनी केले. या वक्तव्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी पाटलांसह शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केले. गुलाबराव पाटील रांझ्याचा पाटील वृत्तीचा आहे. महाराजांनी त्याची पाटिलकी काढून घेतली. गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? असा सवाल करत वाघ यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..
शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली
गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 19, 2021
- काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. “माझे तीस वर्षे राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावे की, मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले. रस्ते त्यांच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन.” असे गुलाबराव पाटील म्हणाले.