breaking-newsराष्ट्रिय

अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कार-हत्येतील दोषीची फाशी कायम

नवी दिल्ली : जालना येथे २०१२ मध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या दोषीची फाशी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने बहुमताने कायम केली. सत्र आणि उच्च न्यायालयाने रवी अशोक घुमारे या दोषीला फाशीची शिक्षा ठोठावली होती.

दोषी घुमारे याने केलेला गुन्हा निर्घृण आणि दुर्मीळातील दुर्मीळ असल्याने त्याची फाशी कायम ठेवली जावी असा निकाल न्या. रोहिंगट फली नरिमन आणि न्या. सूर्यकांत या दोघांनी दिला. न्या. आर. सुभाष रेड्डी यांनीदेखील घुमारे याचा गुन्हा निर्घृण असल्यावर शिक्कामोर्तब केले, मात्र दोषीला फाशी न देता आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात यावी, असा स्वतंत्र आदेश दिला.

जालनामधील फळविक्रेता इलियास यांची मुलगी ६ मार्च २०१२ रोजी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेजाऱ्यांनी दोषी रवी घुमारे हा लहान मुलांना घराजवळच असणाऱ्या मारुती मंदिर परिसरात चॉकलेट वाटत असल्याचे दिसले होते. ही माहिती मिळताच इलियास यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांना घुमारे त्याच्या घरी छोटय़ा मुलीच्या मृतदेहासह सापडला. घुमारे याने बलात्कारानंतर मुलीचा गळा दाबून हत्या केल्याच्या पुराव्याआधारे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरोधात कलम ३०२, ३६३, ३७६ आणि ३७७ गुन्ह्य़ांतर्गत कारवाई करण्यात आली. २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा २०१६ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button