breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

श्रीनगरमध्ये जाळपोळीचा प्रयत्न

श्रीनगर | श्रीनगरमध्ये घडत असलेल्या गूढ घटनांच्या मालिकेत, शहरातील एका आलिशान बाजारपेठेत मध्यरात्री आग लावण्याचा प्रयत्न थोडक्यात टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर करण्यात आलेले अघोषित बंदचे आवाहन झुगारणाऱ्या दुकानदारांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा प्रशासनाला संशय असल्याची माहिती मिळत आहे.

रविवारी उशिरा मध्यरात्री, रेसिडेन्सी रोडवरील लँबर्ट लेन मार्केटमधील काही दुकानांवर एक ज्वालाग्राही पदार्थ शिंपडण्यात आला, मात्र दक्ष असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी या दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button