breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नाणार प्रकल्प: आंदोलकांवरील गुन्हे मागे

महाईन्यूज | मुंबई

कोकणातील नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ७२ जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा तत्कालीन भाजप सरकारने केल्यानंतर सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने त्यास विरोध केला होता.

स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध असल्याने प्रकल्प लादू नये, अशी भूमिका घेत स्थानिक आंदोलकांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीआधी युती जाहीर करताना नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याची अट शिवसेनेने घातली होती. नाणारमध्ये शिवसेनेचा मेळावा घेऊन प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button