breaking-newsआंतरराष्टीय

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला, १५ जण जखमी

श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाले आहेत. या अगोदर जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. विशेष म्हणजे यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्र व स्फोटकं देखील जप्त करण्यात आली होती. तारिक चन्ना असे या दहशतवाद्याचे नाव असुन तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे नोंद आहे.

तसेच, २६ ऑक्टोबर रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे (केंद्रीय राखीव पोलीस दल) सहा जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील करण नगर भागात सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. सीआरपीएफचे एक पथक तपासणी नाक्यावर तैनात असताना सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसेच, जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे देखील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी असलेले पाच मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला होता. मारले गेलेले सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता ट्रक ड्रायव्हर, व्यापारी आणि इतर राज्यांतील मजुरांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी मजुरांची हत्या केली होती. १५ दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी ४ ट्रक ड्रायव्हर, एक सफरचंदाचा व्यापारी आणि दुसऱ्या राज्यातून आलेल्या सहा मजुरांची हत्या केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button