breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शोषित, वंचित घटकांची कामे करण्यासाठी जीवाचे रान करा – नामदार बच्चू कडू

पिंपरी |महाईन्यूज|

समाजातील शोषित, पीडित, वंचित, गोरगरीब आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय शासनस्तरावर अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागतो. त्या घटकांची कामे करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी केले.

निगडी प्राधिकरण येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि.9) पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे हस्ते केले. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कोविड महामारीत सोशल डिस्टसिंगचे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा कार्यकारिणी व अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची घोषणा संघटक नीरज कडू यांनी केली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराचा भाग म्हणून पक्षाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिले आहे. बच्चू भाऊ कडू यांचे समाजकार्य आणि त्यांची जनमानसात असलेली स्वच्छ प्रतिमा याचा पक्षाला विस्तारात निश्चितपणे फायदा होईल, असा दावा नीरज कडू यांनी केला. तसेच पुढील काळात जनसामान्यांना अडचणीच्या असलेल्या समस्यांना पक्ष वाचा फोडत राहील आणि सर्व प्रकारच्या पुढील काळातील निवडणुका लढविण्याची तयारी पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रमाला पक्षाचे प्रवक्ते अजय महाराज बारस्कर,पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रा.नंदकिशोर जगदाळे,पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे,नगर जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी,शेतकरी संघटना पदाधिकारी संतोष पवार,मंगेश फडके,हवेली तालुकाध्यक्ष महेश कनकोरे,दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे,तुकाराम रणदिवे,बाळासाहेब मराठे,अजिंक्य बारणे,प्रवीण खरात,रामभाऊ कुकडे,संदीप नवले,प्रज्वल जवळकर,नितेश गाडगे,चंद्रकांत उद्गिरे आदींची उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button